धरणगाव (प्रतिनिधी) येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित येथे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शन व आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त दि. 11 एप्रिल मंगळवार ते दिनांक 18 एप्रिल मंगळवार दरम्यान अखंड नाम जप यज्ञ व सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या सप्ताह काळात सकाळी 8.00 वाजता भूपाळी आरती त्यानंतर 8.30 वाजता सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण,सकाळी 10.30 वाजता नैवद्य आरती सायंकाळीं 6.30 वाजता महा नैवैद्य आरती होईल. तसेच सेवा मार्गातील 18 विभागावर मार्गदर्शन होइल. त्यात बालसंस्कार, गर्भ संस्कार, शिशु संस्कार, कृषी शास्त्र वास्तुशास्त्र, ज्योतिष शास्त्र, पिरॅमिडचा उपयोग व वापर व मानवी जीवनातील विविध समस्या यावर विविध तज्ञांकडून सकाळी 10.00 ते 5.00 या वेळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सत्ताह काळात अखंड 7 दिवस 24 तास सेवा केंद्रांत सुरू असेल त्यात 2 सेवेकरी विणावादन 2 सेवेकरी श्री स्वामी समर्थ चरीत्र वाचन व 2 सेवेकरी श्री स्वामी समर्थ मंत्र जप अखंड दरबारात सेवा सुरू असेल. या सेवेत महिला व पुरुष, बालगोपाल, अबालवृद्ध, तरूण मंडळी मोठ्या संख्येने सहभाग घेतील.
11 एप्रिल ग्रामदेवता निमंत्रण यज्ञ भुमी पूर्व तयारी 12 एप्रिल मंडल स्थापना, अग्निस्थापना स्थापित देवता हवन, 13 एप्रिल नित्य स्वाहाकार, गणेश याग मनोबोध याग, 14 एप्रिल नित्य स्वाहाकार, चंडीयाग, 15 एप्रिल नित्य स्वाहाकार, स्वामीयाग, 16 एप्रिल नित्यस्वाहाकार, गिताई याग, 17 एप्रिल नित्य स्वाहाकार, मल्हारी याग, रूद्र याग,18 एप्रिल बली पूर्णाहुती, सत्यदत्त पूजन, व नंतर सप्ताह सांगता होइल. तरी या अखंड सप्ताह सेवेत पंचक्रोशीतील जास्तीत जास्त भाविकांनी सेवेत सहभाग घ्यावा, असे आव्हान श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित धरणगाव तालुका सेवेकरी परिवाराच्या वतीने करण्यात आलेले आहे.











