जळगाव (प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे – खेवलकर यांनी काल जिल्ह्यातील उद्योजक व दानशूर व्यक्तींना कलावंतांना आर्थिक वा धान्य स्वरुपात मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत माजी आमदार गुरुमुख जगवानी यांनी आज एक महिन्याच्या किराणा स्वरुपात मदत सुपूर्द केली.
सद्यस्थितीत कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेल्या दीड वर्षापासून सर्व कलांचे सादरीकरण बंद झाले आहे. यामुळे या कलाप्रकारांचे सादरीकरण करुन आपली उपजिविका करणाऱ्या कलावंतांवर मात्र आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. त्याला अनुसरून काल जळगाव जिल्हा मध्यवर्तीसह बँकेच्या अध्यक्षा तथा अखिल भारतीय नाट्य परिषद जळगाव शाखेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे – खेवलकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांना निवेदन देतेवेळी जळगाव जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती तसेच उद्योजकांनी पुढे येऊन या कलावंतांना आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात मदत करावी, असे आवाहन केले होते
रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज माजी आमदार गुरुमुखजी जगवाणी यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने या कलावंतांना एक महिन्याचा किराणा या स्वरूपात मदत केली. माजी आमदार गुरुमुखजी जगवाणी यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे – खेवलकर, लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोदजी ढगे यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी मनोज आहुजा, अशोकभाऊ लाडवंजारी, सुनीलभैय्या पाटील, अशोकभाऊ पाटील आदी उपस्थित होते.