जळगाव (प्रतिनिधी) नवीन बी. जे. मार्केटमध्ये अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून नऊ हजार रुपये आणि दीड लाखांचे स्पेअर पार्ट लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रविवारी सायंकाळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा आहेत.
प्रदीप नानकराम रामचंदानी (वय ४०, रा. कंवरनगर, जळगाव) यांच्या मालकीचे गुरुनानक ट्रेडर्स या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी नऊ हजार रुपये रोख व दीड लाखांचे सबमर्सिबल पार्टस लांबवले आहेत. प्रदीप रामचंदानी यांनी अहमदाबाद, राजकोट, भडगाव व खेडी येथून आणलेले कॉपरसह गन मेटल बुश आदी साहित्य आणले होते. दि. २१ ऑक्टोबर रोजी रात्री ही चोरी झाली आहे. ९ हजार रुपये रोखसह १ लाख ५४ हजारांच्या वस्तू चोरी गेलेल्या आहेत.