अमरावती (वृत्तसंस्था) कूलरला स्पर्श होऊन विजेचा जबर धक्का बसल्याने दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवार, ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तालुक्यातील खल्लार येथे घडली. जियान शहा नासीर शहा (रा. खल्लार), असे मृतक चिमुकल्याचे नाव आहे.
बुधवारी सायंकाळी जियान शहा हा घरात खेळत होता. त्यावेळी घरातील कूलरला त्याचा स्पर्श झाला. त्यामुळे त्याला विजेचा जबर धक्का बसला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर त्याला तत्काळ गावातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला अमरावतीला घेऊन जाण्यास कुटुंबीयांना सांगितले. त्यानुसार त्याला अमरावतीमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान जियान शहा याचा मृत्यू झाला.
जियानच्या पार्थिवावर गुरुवारी बेंबळा बु. येथील कब्रस्तानमध्ये बु. अंत्यसंस्कार करण्यात आले. जियान शहा याला दोन जुळ्या बहिणी असून आई-वडिलांना तो एकुलता एक मुलगा होता. मुलाचा मृतदेह पहिल्यानंतर आई-वडिलांनी काळीज चिरणारा आक्रोश केला होता.