जळगाव (प्रतिनिधी) शहरातील विद्यानगरातील ३९ वर्षीय रहिवासी सकाळी बाथरुममध्ये चक्कर येवुन पडला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापुर्वीच डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, अजितराज प्रवीणचंद्र बोहरा (वय-३९) असे मयताचे नाव असून जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह कुटूंबीयांना सोपवण्यात आला. रामानंदनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक ललीत भदाने करीत आहेत.