मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीच्या रोहिणीताई खडसे यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनापासून मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सुरु केलेल्या, राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या पंधराव्या दिवशी रावेर तालुक्यातील मांगी,चुनवाडे, थोरगव्हाण,बोरखेडा, कोचुर बु येथील नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी उपस्थित नागरिकांशी बोलतांना जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील म्हणाले की, जनसामान्यांचे प्रश्न अडीअडचणी जाणून घेण्यासाठी रोहिणीताई खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनसंवाद यात्रा सुरू केलेली आहे. त्यात त्या प्रत्येक गावात जाऊन समस्या जाणून घेत आहेत. आज आपला पक्ष सत्तेत नाही तरी जनतेच्या समस्या जाणून घेऊन एकनाथराव खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठी सर्व पदाधिकारी पर्यंत करत आहेत. जनसंवाद यात्रेवर पक्षाच्या वरिष्ठांचे लक्ष आहे पक्षाचे प्रदेश पातळीवर जनसंवाद यात्रेचा अहवाल द्यावा लागतो. काही पदाधिकारी सकाळी पक्षाच्या कार्यक्रमात दिसतात तर संध्याकाळी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे दिसतात असे आगामी काळात चालणार नाही. असे करणाऱ्यांना पक्षातून निष्कासित करण्यात येईल.
ते पुढे म्हणाले की, कोचुर परिसर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे आतापर्यंत च्या सर्व निवडणुकांमध्ये या परिसराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भरगोस मतदान केले आगामी काळात सुद्धा पक्षाच्या पाठीशी उभे राहा व पक्षाची सभासद नोंदणी सुरू असुन जास्तीस्त जास्त सभासद नोंदणी करण्याचे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले
यावेळी यात्रेत रोहिणीताई खडसे व पक्षातील पदाधिकाऱ्यांसह मांगी येथील सरपंच सविता ताई सपकाळे, उपसरपंच किशोर कोळी, सदाशिव कोळी, रितेश सपकाळे, विकास सोनवणे, देवेश कोळी, ललित चौधरी, सुनिल कोळी, नारायण कुरकुरे, गोपाळ सोनवणे, सुनिता ताई सपकाळे, कमलाबाई कोळी, वैशाली ताई कोळी, सुनिता ताई राणे, कमल ताई कोळी, सुनंदा ताई घोलप, चुनवाडे येथील सरपंच सविता ताई सपकाळे, स्वप्निल सपकाळे, भास्कर महाले, दिपक सपकाळे, पितांबर सपकाळे, अक्षय सपकाळे, रितेश सपकाळे, शकुंतला ताई कोळी, सुनिता ताई सपकाळे, निर्मला ताई सपकाळे आदी.
थोरगव्हाण येथील सरपंच सुपडू कोळी, सचिन चौधरी, दिपक चौधरी, चेतन चौधरी, नरेंद्र पाटील, चंद्रकांत पाटील, प्रकाश बाऊस्कार,प्रफुल पाटील, पंकज चौधरी, संदिप चौधरी, कविता चौधरी, माजी सैनिक सुरेश चौधरी, अशोक तायडे, शालिग्राम चौधरी, अशोक तायडे, मधुकर चौधरी, सरला ताई चौधरी, वनिता ताई कोळी, दत्तू कोळी, डिगंबर झोपे, संदिप चौधरी, संतोष कोळी, धिरज पाटील, कोचुर बु येथिल सुनिल पाटील, उज्वल पाटील, सुनिल राऊत, सुनिल पाटील,सुनिल चोपडे, कमलाकर पाटील, केतन पाटील,भगवान पाटील, रविंद्र महाजन, सरपंच भगवान आढळे,मुरलीधर पाटील, पितांबर पाटील,डॉ राहुल पाटील, गणेश महाजन, मोहन परदेशी,विनोद पाटील, सागर तायडे, किशोर पाटील,परेश गोसावी, ललित महाजन, अतुल महाजन, रोहिदास महाजन, चंद्रकांत पाटील, रमेश कोळी, कमलाकर आढळे, विलास राऊत,योगेश पाटील, शंकर पाटील, प्रकाश महाजन आणि ग्रामस्थ उपस्थित होते.