फैजपूर (प्रतिनिधी) येथील म्युन्सीपल शाळेचे प्रभारी मुख्यध्यापकांच्या पत्नीची ७३ हजार ६९९ रुपयांत ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात किशोर तुकाराम तळेले (वय ५२, रा. बामणोद ह.मु. सहकार नगर टेक्निकल हायस्कुल च्या मागे भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २९ मार्च २०२२ रोजी ०८.२५ ते ०९.०० वाजेच्या दरम्यान फिर्यादी फैजपुर म्युन्सीपल शाळेत असतांना त्यांच्या पत्नीच्या फोन वरुन व्हाट्सअँपवर मेसेज आला की, तुमचा ऑनलाईन भरलेला साईट बिल अपडेट झालेला नाही. तरी तुम्ही मो.न. ९०९००४६८६२या वर कॉल करा. असा आल्याने फिर्यादी ने सदर मोबाईलवर कॉल केले. सदर मोबाईल धारक महेश शर्मा म्हणुन इलेक्ट्रिक विभाग मेन ब्राच बांद्रा वरुन बोलतो असे बोलुन फिर्यादी कडुन माझी बॅकेची माहीती घेवुन फिर्यादीयाचे खात्यातुन परस्पर ऑनलाईन ७३,६९९.२० रु. काढुन फिर्यादीची फसवणुक केली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलील निरीक्षक सुधिर पाटील करीत आहेत.