जळगाव (प्रतिनिधी) शहरातील एका डॉक्टरची ४९ हजारात ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात शेख अलीम अहमद (वय ५२, जोशी पेठ जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १५ मार्च २०२२ रोजी अज्ञात महिलेने तिच्या मोबाईल क्रमांक ८११४१७५१७३ वरुन शेख अहमद यांच्या मोबाईलवर फोन करुन सांगीतले की, मैं आयसीआसीआय बँक से बोल रही हुं, आपके कार्डपर ऑनलाईन ट्रान्सॅक्शन चल रहा है. उसको बंद करना है. आप नही बंद करोगे तो उसका भुगतान हर महीने आपको ४९,३१२ रुपये भरणा पडेगा. त्यावर शेख अलीम यांनी समोरील महिलेस सांगितले की, मी कोणताही ऑनलाईन व्यवहार केलेला नाही. तरी तिने ओटीपी नंबर विचारला. शेख यांनी ओटीपी सांगताच त्यांच्या अंकाऊटमधून पैसे गेले. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.