जळगाव (प्रतिनिधी) सुरभि आणि बहुभाषिक ब्राह्मण महिला संघातर्फे 2 दिवशीय ऑनलाइन “दिवाळी फराळ रेसिपी” कार्यक्रम घेण्यात आला.
“मानिनीज किचन” च्या मानिनी तपकिरे ह्यांनी सध्या व सोप्या पद्धतीने सर्व दिवाळीचे फराळ घरीच कसे करावे, तसेच वेगवेगळ्या टिप्स ही त्यांनी ह्या वेळेस दिल्या, ह्या कार्यक्रमात एकूण 257 महिला जळगाव, भुसावळ, जामनेर, अमळनेर, यावल, नाशिक, पुणे, मुबंई, खरगोन व इतर ठिकाणाहून ऑनलाइन सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमात तपकिरे यांनी कणकेचे लाडु, खस्ता पुरी (मठरी), शंकरपाळे, चकली, रतलामी शेव,आलू भुजिया शेव, चिरोट्या, फरसाण चिवडा इत्यादी प्रकार शिकविल. यावेळी स्वागत व कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्षा स्वाती कुलकर्णी ह्यांनी केले. तर कार्यक्रमाचे परिचय मंजुषा राव, प्रास्ताविक सुधाताई खटोड, आभार वृंदाताई भालेराव यांनी केले.
सुरभि महिला मंडळ, बहुभाषिक ब्राह्मण महिला संघ, राष्ट्र सेवा समिती, ब्रह्मश्री संस्था, ब्रह्म महाशिखर परिषद (पुणे), व इतर महिलांनी सहभाग घेतला. ह्यावेळी महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना मानिनी ताईंनी उत्तरे दिली, कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षा स्वाती कुलकर्णी ह्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत आरोग्याची काळजी घेऊन तसेच पर्यावरणपूर्वक दिवाळी साजरी करावी. ध्वनी प्रदूषण टाळून कोणाला आपल्यामुळे त्रास होणार नाही, अशी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले.