जळगाव (प्रतिनिधी) शहरात खाजगी नोकरी करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाच्या फ्लीपकार्ट वॉलेटवरून ऑर्डर आयडी चोरून २९ हजार ७९७ रुपयांची खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात तेजेश्वरराव गोकुळ पाटील (वय ३२, रा. विश्वजित अपार्टमेंट, त्र्यंबक नगर जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २ फेब्रुवारी २०२२ रोजी अज्ञात व्यक्तीने तेजेश्वररावच्या संमतीवाचुन त्याच्या फ्लीपकार्ट वॉलेटवरून order id OD१२४०६४८९७३९४५६१००० द्वारे २९७९७ रु ची खरेदी करुन फसवणुक केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोना प्रविण जगदाळे हे करीत आहेत.