नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शेतकरी आंदोलनात विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करत आहेत असा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.
शरद पवार हे जेव्हा देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा याच मुद्द्यांवरुन त्यांनी देशाच्या सगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. बाजार समित्यांच्या कायद्यात बदल करणं आवश्यक आहे असं त्यांनी या पत्रात लिहिलं होतं. शेतकऱ्यांना कधीही त्यांचा शेतमाल विकण्याचा हक्क असला पाहिजे असंही या पत्रात त्यांनी म्हटल्याचं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. शरद पवारांच्या पत्राची आठवण करुन देत त्यांनी काँग्रेस, टीडीपी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या पक्षांवर टीका केली आहे. आम्ही शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. मोदी सरकारला शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करायचं आहे. त्यासाठी हे कायदे आणले गेले आहेत. असंही रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.