जळगाव (प्रतिनिधी) वाशिम जिल्हा येथील ठेवीदाराने भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी या संस्थेत ठेव रक्कम जमा केली होती. मात्र, रक्कम परत न मिळाल्याने ठेवीदाराने वाशिम जिल्हा ग्राहक तकार निवारण आयोग समोर तकार दाखल केली होती. यानंतर जिल्हा ग्राहक तकार निवारण आयोग यांनी वरील रक्कम वसुलीसाठी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना वसुली प्रमाणपत्र वर्ग केले. त्यानंतर वसुलीची कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जळगाव तहसीलदारांना आदेश दिले आहे.
वाशिम जिल्हा येथील ठेवीदार नामे कमलाकर बालाजी ढवळे (रा. स्टेट बँक ए.टी.एम. समोर हायवे मालेगांव ता. मालेगाव जि. वाशिम) यांनी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी या संस्थेत ठेव रक्कम जमा केली होती. ठेवींचा तपशील 10,88,052 रुपये व 10,71,264 रुपये अशी आहे. सदरील ठेव रक्कम संस्थेकडून परत मागणी केल्यावर मिळाली नसल्याने सदरील ठेवीदार यांनी वाशिम जिल्हा ग्राहक तकार निवारण आयोग समोर तकार दाखल केली होती. सदरील तकार जूर झाल्यानंतर वसुली अर्ज क 08/15 व 09/15 दाखल करून रक्कम वसुलीची मागणी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 25 अन्वये केली.
जिल्हा ग्राहक तकार निवारण आयोग यांनी वरील नमुद रक्कम वसुलीसाठी जिल्हाधिकारी जळगाव यांना वसुली प्रमाणपत्र वर्ग केले. जिल्हाधिकारी जळगाव यांनी सदरील रक्कम वसुलीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकार विभाग जळगाव यांना 2015 मध्ये वर्ग केले. जिल्हा उपनिबंधक सहकार विभाग जळगाव यांनी सदरील प्रकरण वसुलीसाठी अवसायक भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी यांना वर्ग केले. सन 2015 पासून वसुली होत नसल्याने ठेवीदार यांनी माहिती घेतल्यावर ठेवीदाराला काही रक्कम वसुली होत नसल्याचे निष्पन्न झाल्यावर ठेवीदार यांनी दि. 20/04/2021 रोजी अॅड. राजेश एस. उपाध्याय, भुसावळ यांचे मार्फत जळगाव जिल्हाधिकारी यांचे समोर अर्ज सादर करून वरील नमुद वसुली प्रकरण जिल्हा उपनिबंधक सहकार विभाग जळगाव यांचेकडून काढून तहसिलदार यांना वर्ग करणेबाबत विनंती केली.
ठेवीदाराचे सदरील अर्जावर जिल्हाधिकारी यांनी दि. 9 मार्च 2022 रोजी क. महसुल/जमिन/5 /आर.आर.सी./एस. आर./जिउनि./43 व 44/15 या आदेशान्वये जळगाव तहसिलदार यांना आदेश करून उपरोक्त वसुली रक्कम कसुरदार यांचे मालमत्तेचा शोध घेवून महाराष्ट जमिन महसुल संहिता 1966 मधील तरतुदीनुसार व त्याखालील नियमानुसार येणे असलेली थकीत रक्कम जिल्हा ग्राहक तकार निवारण मंचाचे आदेशाप्रमाणे वसुलीची कार्यवाही करण्यात यावी. तसेच आदेशात नमुद केल्याप्रमाणे वसुल करण्यात आलेल्या रक्कमा तकारदार कमलाकर ढवळे यांचेकडे परस्पर देण्यात येवून तसा पुर्तता अहवाल सादर करणेकामी आदेश पारीत केला. तकारदारतर्फे भुसावळ येथील अॅड. राजेश एस. उपाध्याय यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांचे कार्यालयात बाजू मांडली.