जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यास अडचणी निर्माण करुन तसेच वसुली संदर्भात मालमत्तेवरील जप्ती टाळण्यासाठी त्यांचे बक्षीसपत्र करून देत बँकेची फसवणूक केली. त्यामुळे श्री महावीर अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. जळगावच्या यामध्ये महेंद्र शहा, सुरेंद्रकुमार लुंकड, तुलशीराम बारी या तीन संचालकांसह त्यांच्या मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
श्री महावीर अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. या पतपेढीने सन २००२ मध्ये जिल्हा बँकेकडून आठ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाची परतफेड झाल्यामुळे त्यांचे कर्ज थकले होते. कर्ज थकल्याने बँकेने सहकार न्यायालयात पतपेढी व संचालकांविरुद्ध दावा दाखल केला. त्यात सहकार न्यायालयाने सर्व संचालकांना वैयक्तिक व संयुक्तरित्या जबाबदार धरुन कर्जाची परतफेड करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी संचालकांकडून वसुलीसाठी कारवाई सुरू करत मिळकतींवर जप्ती बोजा लावण्यासाठी तलाठी, भूमापन अधिकाऱ्यांकडे पत्र दिले होते. तसेच दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये संचालकांच्या मिळकतींचा व्यवहार करू नये, असे पत्र दिले आहे.
जूना उतारा जोडून तयार केले बक्षीसपत्र बैंक मिळकतींचा लिलाव करेल, अशी संचालकांना खात्री झाल्याने संचालक सुरेंद्रकुमार रथमल लुकड यांनी मुलासोबत स्वारातील प्लॉट करून क्रमांक ४४ व १८ नोव्हेंबर २०२३ रोजी भूखंड क्र. ५८६ याचे दुय्यम निबंधकांकडे मिळकतीचा जुना उतारा जोडून विना मोबदला बक्षीसपत्र केले होते. अशाच प्रकारे महेंद्र दुर्लभ शहा यांनीसुद्धा मुलासोबत संगनमत करून भूखंड क्र. २७२, तुळशीराम खंडू बारी यांनीदेखील जुने उतारे लावून मुलांच्या नावे मिळकतीचे बक्षीसपत्र करून दिले आहे.
मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश
न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. मुगळीकर यांनी चारही अर्जातील विनंती मान्य करुन सुरेंद्रकुमार लुं कड, महेंद्र दुर्लभजी शहा, तुळशीदास खंडू बारी तसेच त्यांच्या मुलांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही.व्ही. मुगळीकर यांनी मंगळवारी दिले. जिल्हा बँकेच्यावतीने फौजदारी अर्जाचे कामकाज अॅड. केतन ढाके यांनी पाहिले.
अर्ज देवूनही पोलिसांनी दाखल केला नाही गुन्हा
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तसेच पोलिस अधीक्षकांकडे लेखी अर्ज केला होता. मात्र पोलिसांनी संचालकांनी केलेला गुन्हा दखलपत्रात असतांना देखील त्यांनी गुन्हे दाखल केले नाहीत. त्यामुळे बँकेने अॅड. केतन ढाके यांच्यामार्फत मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे संचालकांविरुद्ध फौजदारी अर्ज दाखल केला. न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, श्री महावीर अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. जळगावच्या संचालकांकडून दखलपत्र गुन्ह्याचे नेतृत्व केल्याचे दिसते. शिवाय नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्याने कथीतपणे घेतलेल्या भूमिकेकडेही लक्ष देण्याची गरज आहे, असे आदेशात नमूद केले आहे