TheClearNews.Com
Tuesday, December 23, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस “ताल सुरन का मेल” या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 4, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस अर्थात सोमवार दि. ७ मार्च रोजी संध्याकाळी ठीक ७ वाजता दसक्कर सिस्टर्स प्रेझेंटस् “ताल सुरनका मेल” या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन कांताई सभागृहात केले आहे. कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभासाठी महापौर जयश्री सुनील महाजन, ज्योती अशोक जैन, डॉ.अनुराधा अभिजित राऊत, डॉ. अमृता प्रवीण मुंढे, तसेच डॉ. शिल्पा किरण बेंडाळे या मान्यवरांची उपस्थिती राहील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता झारे करणार आहेत.

अश्विनी दसक्कर भार्गवे, कु. ईश्वरी दसक्कर, कु. गौरी दसक्कर, कु. सुरश्री (पूजा) दसक्कर भगिनी या नाशिकमधील संगीतक्षेत्रातील नामांकित घराण्यांपैकी एक म्हणजे दसक्कर घराण्याच्या चौथ्या नवीन पिढीचे नेतृत्व करीत असून संगीतक्षेत्रात सतत नवनवीन, वेगवेगळे, वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग करीत असतात.
त्यांना संगीतकलेचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांचे सांगितिक शिक्षण आजोबा ज्येष्ठ संगीततज्ज्ञ पं. प्रभाकर दसक्कर काका माधव दसक्कर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संवादिनीवादक पं. सुभाष दसक्कर यांच्याकडे तसेच जयपूर ग्वाल्हेर किराणा घराण्याच्या गायकीचे शिक्षण विदुषी अलका देव मारुलकर व विदुषी मंजिरी असनारे केळकर यांच्याकडे झाले. लहानपणीच स्वराज्ञानासारखी अवघड गोष्ट सहज साध्य झाल्याने शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, अभंग, भजन, गौळण, भावगीते, गझल, फ्युजन यांबरोबरच हार्मोनियम आणि सिंथेसायझर वादनात त्या पारंगत आहेत.

READ ALSO

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

चाळीसगावात प्रतिभा चव्हाण यांचा दणदणीत विजय

सुभाष दसक्कर यांच्या देशविदेशातील सांगीतिक देवाणघेवाणीमुळे सगळ्या प्रकारचे संगीत ऐकण्याची, वाजवण्याची, गाण्याची आवड निर्माण होत असतानाच दसक्कर भगिनींनी Vocal Harmony या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोख्या प्रकाराला सुरुवात केली. हिंदी, मराठी भावगीते, सिनेसंगीतातील लोकप्रिय गीते यांबरोबरच पाश्चिमात्य सिम्फनी घेऊन त्यावर हा आगळावेगळा प्रयोग करणे ही त्यांची खासियत ! मूळ सुरावटीला कुठेही धक्का न लावता गीताचे बोल आणि वाद्यसंगीताच्या धून वरदेखील आवाजाचे वेगवेगळे टोन वापरून Vocal Harmony चे सादरीकरण त्या करतात. त्यांच्या या अनोख्या प्रयोगाचे कौतुक संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार जसे की, पद्मभूषण पं. राजन साजन मिश्रा, पद्मविभूषण पं बिरजू महाराजजी, तालयोगी पं सुरेशदादा तळवलकर, पं विश्वामोहन भट, पं विभव नागेशकर, पं अजय पोहनकर, पं अरविंदकुमार आझाद, विदुषी अश्विनी भिडे देशपांडे, विदुषी मंजुषा पाटील तसेच सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांकडून आणि जगभरातील लाखो चोखंदळ आणि दर्दी रसिकांकडून झालेले आहे.

त्यांनी आजवर अनेक स्वरचना केल्या आहेत. त्यात मुख्यत्वेकरून बंदिशी, रागमाला, तराणे, प्रार्थना, देशभक्तीपर गीते अशा अनेक रचनांचा समावेश आहे. नुकतीच त्यांनी “ताल सुरनका मेल” या अतिशय आगळ्या वेगळ्या दशरंगी प्रकारची निर्मिती केली. त्यातील शब्द, संगीत, गायन, वादन, संयोजन हे सगळे त्यांचेच असून त्यांच्यावरच चित्रित करण्यात आले आहे. हा नवीन, वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक प्रकार आजवर संगीतक्षेत्रात कुठेही झाला नाही, असे अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना सांगत त्यांचे भरभरून कौतुक केले आहे.

त्यांचे भारतात विविध प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये अनेक मान्यवर कलाकारांच्या उपस्थितीत गाण्याचे व वादनाचे कार्यक्रम झाले आहेत. यामध्ये वसंतोत्सव पारनेर , सुश्री सीता पवार महोत्सव खंडवा , बालगंधर्व महोत्सव जळगाव , वर्ल्ड हार्मोनियम समीट बंगलोर , निनादिनी संगीत महोत्सव गोवा , देवगांधार संगीत महोत्सव , गोपीकृष्ण संगीत महोत्सव, नाशिक, नवदुर्गा पुरस्कार मुंबई, आदि अनेक ठिकाणी व मुंबई आकाशवाणी, रेड एफएम, माय एफएम अशा रेडिओ वाहिन्यांवर त्यांचे कार्यक्रम झाले आहेत व त्यांनी स्पर्धांचे परीक्षण केले आहे. तसेच ABP माझा, झी युवा, झी 24 तास, कलर्स मराठी या चॅनेल्सवरुन त्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले.

शक्ती पुरस्कार, ज्ञानगंगा पुरस्कार, रासबिहारी इंटरनॅशनल स्कुल म्युझिक अवॉर्ड, नाशिकचा लावण्यवती पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांनासन्मानित केले गेले आहे. त्यांना गायन व वादनासाठी भारत सरकारची मान्यताप्राप्त स्कॉलरशिप मिळाली आहे. तसेच त्यांनी संगीत MA पदवी आणि संगीत विशारद विशेष नैपुण्यासह प्राप्त केले आहे.

लहान मुलांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी कशी निर्माण करावी या विषयावर त्यांचे विशेष प्रेम व अभ्यास आहे. लहान मुलांवर संगीत कलेच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करणे त्यांना आवडते. त्यांनी आजवर बालसाहित्यातील अनेक कवितांना आकर्षक स्वररचना देऊन संगीतबद्ध केले आहे. काही नाटके व एका शॉर्टफिल्म साठी त्यांनी गाण्याची रचना व संगीत संयोजनाचे काम केले आहे.

दसक्कर सिस्टर्स या त्यांच्या युट्युब चॅनल, फेसबुक पेज व इन्स्टाग्राम पेजवर त्या नवनवीन प्रयोग सादर करत असतात. चांदोरकर प्रतिष्ठानाने जळगावच्या सांस्कृतिक समृध्दी साठी सतत काहितरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. समस्त महिला वर्गाने चुकवू नये असा हा कार्यक्रम आहे. अर्थात तो सर्व रसिकांसाठी खुला आहे. कार्यक्रम ठीक ७ वाजता सुरू होईल रसिकांनी ६.५० पर्यंत आसनस्थ व्हावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

वैज्ञानिक दृष्टिकोनासह, रोगमुक्त रोपांना प्राधान्य द्यावे- डॉ. अशोक धवन

December 22, 2025
चाळीसगाव

चाळीसगावात प्रतिभा चव्हाण यांचा दणदणीत विजय

December 22, 2025
जळगाव

रावेर लोकसभेत भाजपाचा दबदबा; जळगावात शिंदे गट ‘फॉर्मात’

December 22, 2025
जळगाव

लिंबूवर्गीय फळांसाठी मातीचे आरोग्यासोबत पाण्याचे व्यवस्थापन सांभाळा – डॉ. हिमांशू पाठक

December 22, 2025
चाळीसगाव

बाजार समितीत चोरी; बालाजी ट्रेडिंग कंपनीतून 1.70 लाखांची रोकड लंपास

December 21, 2025
गुन्हे

स्टेशन परिसरात जुन्या वादातून तरुणावर गोळीबार

December 20, 2025
Next Post

CISCE : विद्यार्थ्यांनो दहावीच्या दोन पेपरांच्या तारखा बदलल्या ; आता 'या' तारखांना होणार पेपर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रवादीचे युवानेते आ.रोहित पवार उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर !

January 23, 2021

सेवानिवृत्त मुख्याध्यापकांच्या घरात भरदिवसा चोरी ; सोने-चांदीचे दागिने लंपास !

February 20, 2025

धरणगावात 10 जुलै रोजी श्री दत्तात्रय महाराज महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

July 8, 2025

केंद्रानं केंद्राचं काम करावं, पण राज्याच्या अधिकारावर गदा आणू नये : अजित पवार

September 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group