जळगाव (प्रतिनिधी) भारतीय स्वातंत्रयाच्या अमृत महोत्सव वर्षातर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभाथ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी दि. २४ एप्रिल, २०२२ ते १ मे, २०२२ या कालावधीत किसन भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत प्राधान्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या मोहिमेचा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांनी केले आहे.
राज्यात पी.एम.किसान नोंदणीकृत एकुण ११४.९३ लाख लाभार्थ्यापैकी ८१.३६ लाख लाभार्थी किसान क्रेडिट कार्ड धारक आहेत. राज्यात जवळपास ३३.५७ लाख पी.एम. किसान नोंदणीकृत लाभार्थी हे अद्यापही किसान क्रेडिट कार्ड धारक नाहीत. यासाठी दि.२४ एप्रिल, २०२२ रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये पी.एम.किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. या विशेष ग्रामसभेत पी.एम.किसान लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज देण्यात येतील.
जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली किसान भागीदारी प्राथमिकता हमारी ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सहाकार, महसूल, ग्रामविकास, कृषि, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विभाग, नाबार्ड आणि जिल्हा अग्रणी बँक या सर्व यंत्रणाच्या समन्वयाने माहिम राबविण्यात येईल.
यानुसार सर्व संबंधित बँक किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्याच्या विहित कार्यपध्दतीनुसार पात्र लाभार्थ्यांचे अर्ज विशेष ग्रामसभेत घेऊन १ मे, २०२२ पर्यंत त्यांना किसान क्रेडिट कार्ड मंजूर करण्याची कार्यवाही पूर्ण करतील यासाठी जिल्हा अग्रणी बँक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील संबंधित सर्व बँकांनी योजनेतील लाभार्थ्यांना किंसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्याची आणि त्यांचे पी.एम.किसान योजनेचा लाभ मिळत असलेले बँक खाते आधार आधारित पेमेंटसाठी अधिकृत करुन घेण्यासठी संनियंत्रण करावे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत विमा कंपन्यांचे जिल्हा व्य्वस्थापक व कृषि विभागाने २४ एप्रिल रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत पीकविमा योजनेविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात येईल. शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी २६ एप्रिल, २०२२ रोजी गावनिहाय पीक विमा पाठशाला चे आयोजन करण्यात येणार आहे. या पाठशाळेमध्ये शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत सविस्तर माहिती देवून शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करुन सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करुन किसान भागीदारी प्राथमिकता हमारी मोहीम यशस्वी करावी. तसेच या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
या अनुषंगाने संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करुन किसान भागीदारी प्राथमिकता हमारी मोहिम यशस्वी करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी आयोजीत केलेल्या सभेस नमुद सुचना निर्गमित केल्या आहेत. सदर सभेस डॉ. पंकज आशिया, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव (IAS) राहुल पाटील निवासी उपजिल्हाधिकारी जळगाव, संतोष बिडवाई जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव, श्रीकांत झांबरे विभागीय व्यवस्थापक, नाबार्ड अरुण प्रकाश, मुख्य व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, जितेद्र देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा बॅक व पशुसंवर्धन, मत्सयव्यवसाय, राष्टी्यकृत बॅकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. असे जिल्हा उपनिबंधक संहकारी संस्था जळगाव संतोष बिडवाई, यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.