जळगाव (प्रतिनिधी) पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवडयांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींच्या निराकरणासाठी चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे कार्यालय, जी. पी. ओ. बिल्डिंग, दुसरा माळा, मुंबई येथे दि. 17 डिसेंबर, 2020 रोजी दुपारी साडेअकरा वाजता डाक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर डाक अदालतमध्ये टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बॅंक, मनीऑर्डर या संदर्भातील तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह करावा. डाकसेवेबाबची तक्रार दोन प्रतीत श्री. एच.एम.मंजेश, सहाय्यक निदेशक (तक्रार) तथा सचिव डाक अदालत, चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे कार्यालय, जी.पी.ओ. बिल्डिंग, दुसरा माळा, मुंबई 400001 यांच्या नावे 9 नोव्हेंबर, 2020 पर्यंत पाठवावे. असे आवाहन अधिक्षक डाकघर, जळगाव डाक विभाग, जळगाव यांनी केले आहे.