धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्ताने सारा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जळगाव यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यासह विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा होणार असून इतरही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या दि. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ९ वाजेपासून प.रा.विद्यालय धरणगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर व दि. १ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजेपासून “भव्य रक्तदान शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. तसेच मोठा माळी वाडा समाज मढी परिसरातील ग्रामीण रुग्णालयात सकाळी ९.३० वाजता वाटप, सकाळी १० वाजता भगवान बाबा मठ येथे अन्नदान, संध्याकाळी ६.३० वाजता मोठा माळी वाडा स्मशानभूमी लोकार्पण सोहळा, संध्याकाळी ७.०० वाजता हनुमान नगर येथे बोअरवेल, मोटार, पाण्याची टाकीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
यांची असणार प्रमुख उपस्थिती
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत, एरंडोल-पारोळा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील, पाचोरा-भडगाव चे आमदार किशोर आप्पा पाटील, मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील, चोपडा मतदार संघाचे आमदार लताताई सोनवणे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा ताई पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भाऊ भंगाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल दादा माने, जळगाव महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, जळगाव महानगर प्रमुख शरद तायडे यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच सन्मान सोहळ्यामधे धरणगाव येथील गो शाळेला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते एक लाख रुपये देण्यात येणार आहे. तसेच धरणगाव शहरातील नागरिकांना सर्व शिवसेना, युवासेना व विद्यार्थी सेना, अल्पसंख्याक सेना, व्यापारी सेना, युवतीसेना, नगराध्यक्ष नगरसेवक नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.