चोपडा (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ चोपडा व आरसीसी अडावद आणि आरसीसी चहार्डी मार्फत गरीब व गरजू रुग्णांसाठी ऑर्थोपेडिक उपकरणे लायब्ररी अडावद आणि चहार्डी येथे खुली करण्यात आली आहे. अडावद येथील ऑर्थोपेडिक उपकरणे लायब्ररीचे उदघाटन डॉ दुर्गेश जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच चहार्डी येथील ऑर्थोपेडिक उपकरणे लायब्ररीचे उदघाटन डॉ.सागर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून रोटरीचे सह प्रांतपाल नितीन अहिरराव उपस्थित होते.
सदर ऑर्थोपेडिक उपकरणे लायब्ररी गरीब व गरजू रुग्णांना सामाजिक बांधिलकी जोपासत ठराविक अनामत रक्कम घेऊन प्रतिदिन दोन ते पस्तीस रुपये भाडे तत्वावर उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे रोटरी अध्यक्ष ॲड रुपेश पाटील यांनी सांगितले. त्यात सेमिफाऊलर बेड, वॉटर बेड, वाकर, फोल्डिंग व्हीलचेअर, कमोड चेअर, ट्रायपॉड स्टिक इत्यादी साहित्य असणार आहे.
रोटरी क्लब ऑफ चोपडा अनेक सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवत असते त्याचाच एक भाग म्हणून रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद डोळ्यासमोर ठेऊन गरीब व गरजू लोकांसाठी ग्रामीण भागात सुद्धा ऑर्थोपेडिक उपकरणे लायब्ररी असावी असा रोटरीचा मानस होता. अडावद येथील ऑर्थोपेडिक उपकरणे लायब्ररी डॉ प्रफुल्ल पाटील त्यांचे साई छाया हॉस्पिटल येथे उपलब्ध असून चहार्डी येथील ऑर्थोपेडिक उपकरणे लायब्ररी डॉ पराग पाटील यांचे धन्वंतरी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे. गरीब व गरजू रुग्णांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख डॉ सचिन कोल्हे अर्पित अग्रवाल तसेच अडावद आर सी सी चे अध्यक्ष भूषण पाटील सचिव मुन्ना देशमुख अतुल महाजन लक्ष्मण पाटील तसेच चहार्डी आर सी सी चे अध्यक्ष मुकेश पाटील उपाध्यक्ष निलेश बाविस्कर सचिव मनोज पाटील शैलेश धनगर योगेश पाटील यांनी परिश्रम घेतले. तसेच रोटरीचे अध्यक्ष ॲड रुपेश पाटील सह-प्रांतपाल नितीन अहिरराव सचिव गौरव महाले डॉ दुर्गेश जैस्वाल डॉ प्रफुल्ल पाटील डॉ सचिन कोल्हे डॉ पराग पाटील चेतन टाटिया प्रविण मिस्त्री संतोष बाविस्कर नयन महाजन विलास कोष्टी हे कार्यक्रमाला उपस्थित होते.