चोपडा (प्रतिनिधी) येथील लोक अदालतीत दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरण ७७४ पैकी २१ तर दाखल पूर्व प्रकरणे ग्रामपंचागतीच्या दाखल पूर्व प्रकरणे तर विविध विभागांच्या ३२८२ प्रकरणांपैकी १३४ प्रकरण निकाली झाले तर एकूण वसुली ४७लाख ४८ हजार ४६९ रुपयांची झाली.
चोपड़ा न्यायालयातील दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरण ७७४ ठेवण्यात आले होते त्यातून फौजदारीचे धनादेश अनादर प्रकरणे १५ व पती-पत्नी वादाचे तीन प्रकरण व दिवाणी प्रकरणे तीन अशी एकूण २१ प्रकरणे निकाली काढण्यात आले. यात १७ लाख ९६ हजार १९५ रुपये वसूली झाली. बैंक, मराविम व ग्रामपंचागतीचे दाखल पूर्व प्रकरणणे यांची एकूण ३२८२ प्रकरणातून १३४ प्रकरणे निकाली झाले, यात २९ लाख ५२ हजार २७४ रुपये वसूल करण्यात आले. अशी एकूण ४७ लाख ४८ हजार ४६९ रुपये वसूल करण्यात आले. यावेळी पॅनलवर दिवाणी न्यायाधीश एम.व्ही. पाटील राठोडे यांच्या सह पंच म्हणून अॅड. संदिप पाटील, चोपडा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. डी. एस. सोनार, अॅड. नितीन कोळी, अॅड. सचिन पाटील, अॅड. एच. एम. सैय्यद, सरकारी अभियोक्ता व्ही. व्ही घोडेस्वार, भाग्यश्री अहिरराव हजर होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी बार असोसिएशनचे वकील सदस्य, सहाय्यक अधीक्षक एस. जी. नगरकर, वरीष्ठ लिपिक ए. एच.परदेशी, दिनेश राजपूत, संदीप मराठे, कनिष्ठ लिपिक पी. डी. पाटील, अविनाश पाटील, एम. बी. चौधरी, नरेश डी. कुलकर्णी, पी . ए. सोनवणे, एस.जे.देवरे, वाय. ए. महाजन, एस.के. पाटील, एम . बी. बाविस्कर,शिपाई प्रविण पाटील, दिपक महाजन, विलास बैसाने, आदिंनी सहकार्य केले. बँकेचे शाखा अधिकारी व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांचे सहकार्य लाभले.