भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच एकाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडली आहे. याप्रकरणी भडगाव पोलिसात एका तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत अल्पवयीन विद्यार्थिनीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पीडिता इयत्ता १० वी बोर्डाचे पेपर देण्यासाठी जात असतांना संशयित आरोपी तरुण हा १ मार्चपासून सतत पाठलाग करत होता. तर दि. १५ मार्च रोजी त्याने पिडीतेला मी तुझ्यावर प्रेम करतो. तू का करत नाही, असे म्हणाला. तसेच पिडीतेचा हात धरुन बोलला की तू मला ध्यानात ठेव. मी तुला बघून घेईल, अशी धमकी देवून वर्गातून निघून गेला. एवढेच नव्हे तर संशयित आरोपी याने हात धरुन प्रेम करण्यासाठी बळजबरी करुन पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.