पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा नगरपरिषदेच्या मालकीच्या नव्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळ्यांचा लिलाव सध्या सुरू असलेल्या, तो कोरोना साथीच्या आजारामुळे पुढे ढकलण्यात यावा, अशी मागणी सचिन सोमवंशी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
कोरोना महामारीचा गेल्या ८-९ महिन्यांपासून संपूर्ण देशात थैमान सुरू आहे. देशात आजही साथीचा कायदाची अमंलबजावणी सुरु आहे. त्यामुळे लॉकडाउन करण्यात आला आहे. लॉकडाउन देखील पुर्णपणे उघडण्यात आला नसून लॉकडाउनमुळे लहान मोठे व्यापारी यांची व्यापारपेठ उध्वस्त झाली आहे. त्यामुळे लहान आणि गरजु व्यापारी यांना गाळा घेण्याची सक्त गरज असतांना देखील ते आजमितीस घेऊ शकत नाही हे दुर्दैव आहे. त्यातच दि. ४ नोव्हेंबर रोजी हा जाहीर लिलाव जरी नगर परिषद ने ठेवला आहे. यात लहान आणि गरजु व्यापारी लिलावात बोली नलावता शहरातील काही धनदांडगे या लिलाव आपल्या पंटर च्या माध्यमातून सहभागी होऊन उच्च बोली लावून अनेक गाळे घेऊन त्या नंतर त्या गाळ्यांची चढ्या भावाने विक्री करतील आणि नफा कमवतील यातुन नगर परिषद चा सर्व सामान्य व्यापारीला न्याय देण्याचा विषय बाजूला राहील यात शंका नाही.
जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे सर्वेसर्वा असतात त्यामुळे त्यांनी सहानुभूती ने कोरोना महामारी पुर्णपणे हद्दपार होई पर्यंत आणि व्यापारी पेठ सुरळीत होई पावेतो सदर चा लिलाव करु नये आणि हा लिलाव पुढे ढकलण्यात यावा, त्याचसोबत लिलावाची हॉफसेट प्राईज कमी करावी जेणेकरून सर्वसामान्य व्यापारी सहभागी होऊ शकतील अशी मागणी कॉग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी शेवटी केली आहे.