चोपडा (प्रतिनिधी) येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलमध्ये नुकत्याच तालुकास्तरीय शासकीय क्रिकेट क्रीडा स्पर्धा भव्य क्रीडांगणावर पार पडल्या. या स्पर्धेत पंकज विद्यालयाचे तीन संघ विजयी ठरत जिल्हास्तरासाठी पात्र ठरले आहेत. क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन चोपडा तालुका क्रीडा समन्वयक आर. पी. आल्हाट, प्राचार्य मिलिंद पाटील व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम सामन्यात 19 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट सामन्यात पंकज उच्च माध्यमिक विद्यालयाने ए एस सी कॉलेज चोपडा यांचा पराभव केला. 19 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट च्या अंतिम सामन्यात पंकज उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संघाने ए एस सी कॉलेज चोपडा यांचा पराभव केला. तसेच 17 वर्षाखालील मुलींच्या अंतिम सामन्यात पंकज माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलचा पराभव केला.
पंकज विद्यालयाच्या तीन संघांनी नेत्रदीपक कामगिरी करत तालुकास्तरावरील शासकीय क्रिकेट स्पर्धेचे सर्वसामान्य जेतेपद मिळवत जिल्हास्तरासाठी निवड झाली तर 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने चावरा इंग्लिश मीडियम स्कूल या संघाचा पराभव करत तृतीय स्थान पटकावले. सर्व विजयी संघांना क्रीडाशिक्षक श्री. अजय सैंदाने सर, मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थी , पालक आणि मार्गदर्शक क्रीडा शिक्षक श्री अजय सैंदाने सर यांचे संस्थाध्यक्ष डॉ. सुरेश. बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे , संचालक पंकज बोरोले, नारायण बोरोले व सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री व्ही. आर. पाटील व संस्थेतील सर्व विभाग प्रमुख ,शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आणि जिल्हास्तरावर यशासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.