जळगाव (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यातील टोळी गावातील दलित मुलीवर बलात्कार करुन तिला जिवे ठार मारण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधात आज शहरात बाराबलुतेदार महासंघाच्या वतीने सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास मेणबत्त्या लावून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
तसेच यावेळी संघातर्फे संबंधित नराधमांना मृत्युदंड देण्याची प्रखर मागणी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष किशोर सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक महानगर जिल्हाअध्यक्ष मुकुंद मेटकर यांनी केले. संघटनेचे नगरसेवक प्रुथ्वीराज सोनावणे, ईश्वर मोरे, राजकुमार गवळी, मोहन साळवी, चंद्र शेखर कापडे, विजय शिंदे, रवींद्र बोर्नारे, गोपाल भावसार, मुकेश गुरव, विजय पाटील, संजय सोनार, सपना पावरा, कू. साक्षी वाघ, तुकाराम बारेला, गणेश सोनगीरे व अनेक तरुण-तरुणी कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी सामूहिक शांती मंत्राने सांगता करण्यात आली आहे.