जळगाव (सुरेश उज्जैनवाल) वढोदा (ता.मुक्ताईनगर) चे माजी सरपंच भाजप चे एकनिष्ठ ज्येष्ठ पदाधिकारी आणि पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट ” बेटी बचाओ बेटी पढाओ ” चे राष्ट्रीय संयोजक , केंद्रीय रेल्वे प्रवासी सुविधा समितीचे सदस्य प्रयोगशील शेतकरी डॉ.राजेंद्र फडके यांचा आज वाढ दिवस वयाची 62 वर्षे पूर्ण करून ते 63 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्याचं यानिमित्ताने अभिष्टचिंतन आणि पुढील वाटचालीस मन: पूर्वक शुभेच्छा….!
डॉ.फडके माजी खासदार, आमदार किंवा राजकीय क्षेत्रातील दिगग्ज व्यक्तिमत्व नसलं तरी एक सामाजिक संवेदनशील सत्शील प्रामाणिक व्यक्ती आणि भाजपा चे यशस्वी पक्ष संघटक भाजप चे एक निष्ठ प्रचारक म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील भाजप शासित प्रदेशात त्यांनी बऱ्या पैकी नावलौकिक मिळविलेला आहे. पेशाने डॉक्टर असून ही त्यांनी अख्खी हयात भाजप च्या प्रचार प्रसारासाठी खर्ची घातली असून ती अव्याहतपणे सुरूच आहे. त्यामुळे राज्यस्तरावरील नेत्यांपासून तर केंद्रीय मंत्र्यां पर्यंत त्यांच्या प्रति विलक्षणआपुलकी अनुभवास येते. संघ,जन संघ ते भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास असला तरी ते आपल्या वडिलांच्या राजकीय विचारांच्या परंपरेचं निरवहन करीत आहे. त्याचे वडील (कै.) अशोक फडके यांनी कॉग्रेस विरुद्ध सातत्याने तत्कालीन एदलाबाद विधान सभेच्या निवडणुकीत जनसंघा च्या माध्यमातून कडवी झुंज दिली.
उत्कृष्ठ निवडणूक प्रबंधक
डॉ .राजेंद्र फडके वढोदा ग्रामपंचायती ची निवडणूक वगळता पुन्हा कधीही स्वतः: निवडणूक लढविली नसली तरी भाजप साठी ते उत्कृष्ट निवडणूक प्रबंधक म्हणून पक्ष संघटनेत ओळखले जातात. केवळ महाराष्ट्रतच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश आदी राज्यात ही त्यांनी यशस्वीपणे निवडणूक प्रबंधक म्हणून काम केले. निवडणूक जिंकण्यासाठी बूथ यंत्रणा कशी असावी व ती किती प्रभावी ठरते हे त्यांनी “वन बूथ टेन युथ ” ही संकल्पना त्यांनी परिणामकारक राबविली. त्यांच्या संकल्पनेची पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून चांगलीच दखल घेतली गेली.
बेटी बचाव आणि फडकेंची संवेदनशीलता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी बेटी बचाव या अभियानासाठी खुद्द श्री मोदीं कडून डॉ. फडकेंची निवड होणे यातूनच त्यांची योग्यता अधोरेखित होते. हे अभियान ते अतिशय तत्परतेने राबवित असले तरी बेटी बचाव बद्दल ची त्यांची आत्मीयता व संवेदनशीलते चा पत्रकार म्हणून मला आलेला अनुभव मी मुद्दाम येथे देत आहे, फेब्रुवारी 2016 मधील ही घटना आहे, माझे सहकारी नवापूर चे रिपोटर निलेश पाटील यांनी स्त्री जातीचे नवजात अभ्रक बेवारस स्थितीत गावा च्या वेशीवर आढळून आल्याची व ते अभ्रक एका आदिवासी भिल्ल विवाहितेने आपल्या घरी नेले, अश्या स्वरुपाची बातमी पाठविली, मी माझ्या रिपोटर ला अधिक माहिती मिळविण्याचे सांगितले. सविस्तर माहिती मिळाल्यानंतर आम्ही ती बातमी प्रकाशित केली आणि त्याची कल्पना फोन वरून डॉ.फडके यांना दिली, त्यांनी तातडीने नवापूर गाठले आपल्या पक्षाच्या सहकाऱ्या सह ते तिथे गेले त्या आदिवासी विवाहितेचा सत्कार करीत काही मदत ही मिळवून दिली. बेटी बचाव चे हे विलक्षण कृतीशील उदाहरणच..! डॉ.फडके स्वभावाने सरळ आणि विचाराने कृतिशील व्यक्तिमत्व असून पक्षातंर्गत गल्ली ते दिल्ली पर्यन्त चा जिव्हाळा ही वाखाळण्या सारखा आहे…
सुरेश उज्जैनवाल, पत्रकार जळगाव
८८८८८८९०१४