धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील कल्याणे होळ येथे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले.
कल्याणे होळ येथे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व तथा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. सर्व युवक व ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून मागच्या वर्षापासून अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड करून पूर्णपणे वृक्षांची काळजी घेतली जाते. या कार्यक्रमास जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर व जिल्हा परिषद सदस्य माजी रवींद्र पाटील, मोहन पाटील, ज्ञानेश्वर महाजन, अरविंद देवरे, मार्गदर्शन लाभले. यावेळी किशोर पाटील, रोहिदास कापडणे, विजयसिंह पाटील, नाना पाटील, संतोष अण्णा, संदीप पाटील, पवन पाटील, सतीश कुवर, देवीदास पाटील, ईश्वर भाऊ, सौरभ पाटील आदी उपस्थित होते.












