चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील मेलाणे गावातील एका बंद खोलीतून सोलर ऊर्जा बॅटऱ्या, सोलर पॅनलच्या प्लेटसह होम लाईट, असा एकूण ७५ हजाराचा माल चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात उदय विश्वनाथ नवले (वय ३८ , रा. मेलाणे ता. चोपडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ८ जून २०२२ रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्याने बंद खोलीचे दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर ४८ हजार रुपये किंमतीच्या प्रभात रेनेबल कंपनीच्या सोलर ऊर्जा ६ बॅटऱ्या, १९ हजार रुपये किंमतीचे गौतम कंपनीच्या सोलर पॅनलच्या २ प्लेट, ४ हजार रुपये किंमतीचे गौतम कंपनीचे २५ होम लाईट, असा एकूण ७१ हजार रुपये किंमतीचा माल चोरून नेला. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ शिवाजी ढबू बाविस्कर हे करीत आहेत.
















