धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी येथून एका पोकलॅन्डचे बँटरी, वायरिंग आणि डिझेल चोरी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात गौरव ओमप्रकाश गुप्ता (वय ४०,रा.जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार २१ जुलै २०२२ रात्री ते रोजी २२ जुलै २०२२ च्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने मुसळी फाट्याच्या गोडावून समोर वोलवोसी-२१०डी कंपनीचे पोकलँन्ड मशिन त्याचा इंजिन (क्र.१२७३६६२९) असा असून डि.बी.००२५२७८७ अशा क्रमांकाचे मशिनमधिल बँटरी, इं.सी.युपार्ट, वायरिंग, डिझेल असा एकूण ३३ हजाराचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विजय चौधरी हे करीत आहेत.