मुंबई (वृत्तसंस्था) राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यातील पोलिस प्रशासन हाय अलर्ट वर आले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच यासाठी कोणत्याही आदेशाची वाट बघू नका असे म्हणतं पोलिसांना पूर्ण मोकळीक असल्याचे सांगितले आहे.
औरंगाबाद येथील सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे पालन न करण्यात आल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह आयोजकांवरही गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. एफआयआरमध्ये राज ठाकरे यांचा उल्लेख प्रमुख आरोपी म्हणून केला आहे.
ठाकरे यांच्यावर औरंगाबाद येथील सिटी पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 116, 117, 135, 153 अ आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी राज ठाकरे यांना सभेसाठी १६ अटी घालत परवानगी दिली होती. पण त्यापैकी १२ अटींचे उल्लंघन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. औरंगाबाद पोलिसांनी ठाकरेंच्या भाषणाची संपू्र्ण रेकॉर्डिंग ऐकली असून “एकदाचं होवून जावू द्या” हे वाक्य ठाकरेंना भोवल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यातील पोलिस प्रशासन देखील हाय अलर्ट वर आले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत अवगत केले आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच यासाठी कोणत्याही आदेशाची वाट बघू नका असे म्हणतं पोलिसांना पूर्ण मोकळीक असल्याचे सांगितले आहे.