अमळनेर (प्रतिनिधी) एका गुन्ह्याच्या प्रकरणात चार्जशीट लवकर तयार करण्याच्या मोबदल्यात १५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या अमळनेर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकाला लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, तक्रारदार यांचे वडील व भाऊ यांचे विरुध्द मारवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. सदर गुह्यात मदत करून गुह्याचे चार्जशीट लवकर पाठविण्याच्या मोबदल्यात पोलीस नाईक भास्कर नामदेव चव्हाण (वय ५१ रा.जुनी पोलीस लाईन, अमळनेर) यांच्याकडे केली होती. यासाठी पोलीस नाईक यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. व सदर लाचेची रक्कम पोलीस नाईक यांनी स्वीकारली असता लाचलुचपत विभागाने पोलीस नाईक भास्कर चव्हाण यांना रंगेहात अटक केली. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस उपअधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली PI.संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ. रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ. महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी कारवाई केली.