धरणगाव (प्रतिनिधी) येथील भाजप कार्यकर्ते प्रथम सुर्यवंशी यांच्या नेत्तृवात शुक्रवारी पाळधी ते अयोध्या अशी कलष यात्रा काढण्यात आली. या यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी उपस्थिती देत कलषाचे दर्शन घेतले
२२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होते आहे. त्या निमित्ताने देशभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे सध्या आयोजन सुरू आहे. धरणगाव येथील भाजप कार्यकर्ते प्रथम सुर्यवंशी यांच्या नेत्तृवात शुक्रवारी पाळधी ते अयोध्या अशी कलष यात्रा काढण्यात आली. या यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी उपस्थिती देत कलषाचे दर्शन घेतले. तसेच यात्रेत सहभागी भाविकांना शुभेच्छा देत प्रभु श्री राम नामाचा जयघोष केला. यावेळी उत्साह व भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी संजय चौधरी, बुटा पाटील, अविनाश महाजन, शेखर महाजन, नीलेश महाले, कल्पेश विसावे, किशोर पाटील आदी उपस्थित होते.