कासोदा (प्रतिनिधी) येथील स्व. सौ.शोभाताई अशोकराव पाटील प्राथ. माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक प्रवीण ज्ञानेश्वर मराठे सर यांना नुकताच राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य नाशिक विभाग यांच्यामार्फत महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रवीण मराठे सर यांना हा पुरस्कार माजी खासदार तथा राष्ट्रीय सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, जि.प.अध्यक्ष नामदार धरती ताई देवरे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सत्यजित तांबे, प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव महाराष्ट्र ज्योतिराव फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य व जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजीराव शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक हा पुरस्कार राजश्री शाहू महाराज नाट्यगृह धुळे या ठिकाणी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
प्रवीण मराठे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्य अशा क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद शिंदे सचिव वैशालीताई शिंदे उपाध्यक्ष उमाकांत हिरे, शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना चौधरी माध्यमिक विभागाचे प्रभारी मुख्याध्यापक कुलदीप पवार, उपशिक्षक राजेंद्र ठाकरे, रवींद्र सोनवणे, राहुल पाटील, दीपक पाटील, ज्ञानेश्वर पाटील,नारायण क्षिरसागर, बबलू तडवी, महेंद्र पाटील, कुलदीप देसले, हर्षल सूर्यवंशी,राहुल पवार, हिरालाल मोरे, सिसोदे, खेडकर, मीरा पाटील, वैशाली पाटील, सुवर्णा देवरे, मयुरी पाटील, मनीषा पाटील,वर्षा वळवी तसेच शिक्षकेतर कर्मचारी सचिन ठाकूर, सुशील शिंदे, संदीप शिंदे उमेश पाटील, सोनू पाटील यांनी अभिनंदन केले आहे.