जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असल्याची माहिती मिळताच जळगावचे शिवसैनिक फरीद खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ख्वाजा मीया बाबांच्या दर्ग्यावर ११ किलो न्याज व ५० बांधवांना अजमेर येथील प्रसिद्ध बाबांच्या दर्ग्यावर स्वखर्चाने घेऊन जाण्याची मन्नत मागितली आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा मणका व मानेच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास बळावल्याची माहिती समोर आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागील आठवड्यापासून हा त्रास जाणवू लागला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी दिली आहे.
ईश्वराच्या कृपेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती ठीक असल्याने जळगाव शहारतील गणेश कॉलनी परिसरातील ख्वाज्या मिया दर्ग्यावर न्याज वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात होता. कार्यक्रमाची सूर्वात दर्गेवर फुलांची चादर शिवसेनेचे उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, उमेश चौधरी, फरीद खान, फिरोज पिंजारी, जाकिर पठाण, यांच्या हस्ते करण्यात आले असून २१ नोव्हेंबर रोजी शिवसैनिक फरीद खान हे ५० शिवसैनिकांना अजमेर येथे घेऊन जाणार आहेत.