नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेच्या ४६ व्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन हे निवडून आलेत. पंतप्रधान मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं. ‘भव्य विजयाबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. भारत-अमेरिका संबंधांसाठी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून तुम्ही यापूर्वी दिलेलं योगदान कौतुकास्पद होतं.
पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. तसंच उपराष्ट्राध्यक्ष निवड झाल्याबद्दल भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांनाही मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. बायडन-हॅरीस प्रशासनासह भारत-अमेरिका संबंध नवीन उंची गाठतील, अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे. आता तुम्ही राष्ट्राध्यक्ष झाल्याने भारत-अमेरिका संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर काम करण्यात आनंद होईल’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन हे विजयी झाले आहेत. त्यासोबतच उपराष्ट्राध्यक्षपदी कमला हॅरीस देखील विजयी झाल्या आहेत. या दोघांचेही पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केलंय. तसंच दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ होतील, अशी आशा व्यक्त केली आहे.
पंतप्रधान मोदींनी आणखी एक ट्विट केलं आहे. भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांच उपराष्ट्राध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. ‘तुमचं यश प्रेरणादायक आहे. हा केवळ भारतीय-अमेरिकेच्या जनतेसाठी अभिमानाचा क्षण आहे.