जळगाव (प्रतिनिधी) २६ जानेवारी निमित्ताने दिल्लीत होणाऱ्या सैन्य दलाच्या आणि एनसीसीच्या परेडकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले असते. दिल्ली येथील राजपथावर २६ जानेवारीला होणाऱ्या संचलनात मूळजी जेठा महाविद्यालयची एन.सी.सी. युनिट ची छात्र सैनिक सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी हर्षल संत ही ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून पद भूषविणार आहे. यावर्षी एन.सी.सी. महाराष्ट्र डायरेक्टरेट मधून केवळ २६ छात्र सैनिकांची निवड करण्यात आली होती.
अमरावती एन.सी.सी. ग्रुपआणि १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअन मधून समृद्धी एकमेव छात्र सैनिकाची निवड झाली होती. समृद्धीच्या या दैदिप्यमान यशामुळे महाविद्यालाच्या इतिहासात आणखीन एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. या परेडमध्ये सहभागी होण्याचे अनेकांच् स्वप्न असते. केवळ या परेड मध्ये सहभागी होण्याचं स्वप्न जळगावच्या समृद्धी हर्षल संत या तरुणीने पूर्ण केले. संपूर्ण भारतातून या पथसंचलनात सहभागी झालेल्या १०० एनसीसीच्या तुकडीचे समृद्धी नेतृत्व करत आहे. समृद्धी संत जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यायची विद्यार्थिनी आहे. लहानपणापासून तिला एनसीसी आणि देशासाठी काम करायचे होते. समृद्धीची ही कामगिरी महाराष्ट्रातील मराठी तरुणीं साठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. उद्या २६ जानेवारीच्या होणाऱ्या पथसंचलनात सहभागी होण्यासाठी समृद्धी ही गेल्या दोन महिन्या पासून कसून सराव करत आहे.
प्रजासत्ताक दिन म्हटलं की आपल्याला राजपथावरचं संचलन आठवतं. पण उद्या देशाचे जवान आणि किसान दोघेही राजधानी दिल्लीत परेड करताना दिसतील. जवानांसोबत रणगाडे तर शेतकऱ्यांसोबत असेल त्यांचा शेतातला साथीदार ट्रॅक्टर. दिल्लीच्या चार सीमांवर जिथे आंदोलन सुरु आहे त्या चारही सीमांवरुन उद्या हे ट्रॅक्टर दिल्लीत बाहेर पडतील. २६ जानेवारीची परेड संपली की ही परेड सुरू होईल. पोलिसांचा दावा ३० हजार ट्रॅक्टर असतील तर शेतकऱ्यांचा दावा अडीच लाख ट्रॅक्टर सहभागी होणार असल्याचा आहे.