जळगाव (प्रतिनिधी) ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डाने सुचित केल्याप्रमाणे भारतभर पवित्र रमजान महिन्याचा शेवटचा शुक्रवार असल्याने या नमाजला जाताना सर्व मुस्लिम बांधवांनी आपल्या दंडाला कळ्या फिती लावून शुक्रवारची नमाज अदा करून वक्फ संशोधन विधेयक २०२४ ला विरोध करावा असे आदेश असल्याने जळगाव शहर व जिल्ह्यातील सर्व मशिदीमध्ये काळ्या फीती लावून नमाज् अदा करण्यात आली व सरकारचा निषेध नोंदवित वक्फ संशोधन बिल परत घ्या, असा ठराव करून तो ठराव जिल्हाधिकारी जळगाव मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना सादर करण्यात आला.
१७५ मशिदीतून ५२ हजार लोकांचा विरोध
जळगाव शहर व आसपास १७५ मशिदीतून सुमारे ५५ हजार नमाजिनी या बिलाचा विरोध केला.
मशिदीसमोर निदर्शने
प्रत्येक मशीद समोर वाफ बिलाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली व त्या ठिकाणी ठरावाचे वाचन करून व संशोधन बिलाबाबत माहिती देण्यात आली. प्रातिनिधिक स्वरूपात मशिदीचे प्रतिनिधींनी एकता संघटना मार्फत अप्पर जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र पाटोळे यांना निवेदन देऊन विरोध नोंदविला.
यांची होती उपस्थिती
मस्जिद ए अक्सा चे फारुक शेख, मदिनाचे अन्वर खान, अबूबकर चे फारुख पटेल, हानफियाचे शाहीर तेली, बिलाल चे दानिश पिंजारी, काँग्रेसचे मुक्तदिर देशमुख ,अर्कमचे बशीर बुरानी, उमरचे अनिस शहा, अल्वजीर चे अबू शाफे, अलमंनांचे जावेद शेख, अलबर्गाचे सईद शेख, बरकतीचे युसूफ खान, नूरानीचे इमरान शेख, अल वजीर चे मुजाहिद अख्तर, अब्दुल सत्तार, उमरचे सलीम इनामदार , अलखिदमत चे युसुफ शाह, अमळनेरचे मौलाना रियाज, कुदरत अली, शेख अर्शद, गफार खाटीक , जळगाव शहराचे रफिक शेख, ताहेर शेख, तहसील खान ,वसीम शेख ,वसीम पटेल, अरबाज खान, राहील अहमद, शेर खा मोहम्मद खान, शेख रियाजोद्दीन, अब्दुल गफार खाटीक आदींची उपस्थिती होती.