चोपडा (प्रतिनिधी) भारताच्या चंद्रयान- ३ मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणात तालुक्यातील तरुण शास्त्रज्ञ संजयभाई गुलाबचंदजी देशलहरा(जैन) यांचाही हातभार लागला आहे. संपूर्ण चोपडा तालुक्यातील जनतेसाठी ही अभिमानास्पद बाब आहे.
भारताच्या चंद्रयान- ३ मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणात चोपडा तालुक्याचाही हातभार लागला आहे. काल दिनांक 14 जुलै 2023 रोजी चंद्रयान 3 चे श्रीहरीकोटा येथून यशस्वी उड्डाण झाले. चंद्रयान बनवण्यासाठी व प्रक्षेपण करण्यासाठी चोपडा तालुक्यातील हातेड गावचे सुपुत्र व चोपडा वर्धमान जैन श्री संघाचे संघपती अध्यक्ष गुलाबचंदजी इंदरचंदजी देशलहरा (जैन) यांचे चिरंजीव शास्त्रज्ञ संजयभाई गुलाबचंदजी देशलहरा(जैन)यांचा देखील मोलाचे हातभार लागला आहे.
इस्रोमध्ये जवळपास वीस वर्षापासून मंगळयान चंद्रयान – 2, चंद्रयान-3 व इतर बरेच संशोधनवर काम आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञ संजयभाई जैन हे करत आहेत. ‘चंद्रयान थ्री’ चे यशस्वी प्रक्षेपण सहभाग असल्यामुळे त्यांचे चोपडा तालुकाभरातून सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व जैन बांधवांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या सहभागामुळे अनेकांनी त्यांना दूरध्वनीवरून तसेच त्यांचे वडिल गुलाबचंद जैन यांना शुभेछा दिल्या आहेत.