जळगाव (प्रतिनिधी) रेशनकार्डमध्ये नाव असलेल्या सर्व लाभार्थ्यांना सरसकट लाभ मिळावा, अशा आशयाचे निवेदन आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना दिले आहे.
राज्य शासनाने रेशन कार्ड धारकांना १०० रुपयामध्ये (रवा, चना, डाळ, साखर, पाम तेल) या चार वस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. कार्ड धारकांना १२ अंकी नंबर मिळालेला नाही. त्यामुळे रेशन दुकानदाराकडे आलेला माल वितरीत होत नाही. तसेच सर्व लाभार्थी म्हणजे रेशनकार्डवर असलेल्या सर्व नागरिकांना सरसकट लाभ मिळावा या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज दि ६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना दिले आहे. या निवेदनावर रवींद्र पाटील, अशोक लाडवंजारी , राजू मोरे, सुनील माळी, इब्राहीम तडवी, अशोक सोनवणे, एस.जे.पाटील, संजय पाटील, अमित तडवी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
















