चाळीसगाव (प्रतिनिधी) ना.गिरिष महाजन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खडकीसिम येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) चे सरपंच व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या परिवारात जाहीर प्रवेश केला.
प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये खडकीसिम गावाचे सरपंच दिनेशभाऊ अहिरे, नितीनदादा पाटील, लोटन दादा पाटील, भाऊसाहेब पाटील, बापूराव जठार, वसंतदादा जाधव, मधुकरभाऊ गोसावी, दत्तात्रयदादा पाटील, सुभाषदादा चव्हाण, भैय्या बागुल आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्वांचे भाजपाचा रुमाल टाकून स्वागत केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर, सुनील पवार, आंनदजी खरात, अमोल चव्हाण, भूषण पाटील आदी उपस्थित होते.