TheClearNews.Com
Wednesday, May 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार हे समाजासाठी प्रेरणादायी – जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचे प्रतिपादन

vijay waghmare by vijay waghmare
May 29, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राजवटीत अत्यंत सुशासन, न्यायप्रियता, सामाजिक समता, आणि सर्वसामान्यांच्या हिताचे राज्यकारभार केला. त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही आधुनिक भारतात आदर्श ठरावी अशी आहे. त्यांच्या विचारातून समाजाला दिशा मिळते, असे मत जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी व्यक्त केले.

३० मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या “३०० किमी – ३०० वाहनांच्या भव्य रॅली” संदर्भात सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी अशोकभाऊ जैन यांची सदिच्छा भेट घेतली. मा. आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली ही ऐतिहासिक आणि गौरवशाली रॅली आयोजित केली जात आहे. त्यावेळी अशोकभाऊ जैन बोलत होते.

READ ALSO

मनरेगा घोटाळ्याची तक्रार करणाऱ्यावर पारोळ्यात कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; १२ जणांवर गुन्हा दाखल

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

त्यांनी पुढे सांगितले की, “अहिल्यादेवी होळकर यांचे शासनकार्य हे केवळ कारभार नव्हे तर लोकसेवेचे उत्कृष्ट उदाहरण होते. त्यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या गरजांचा विचार करून विकासाची दिशा ठरवली. रस्ते, धर्मशाळा, घाट, मंदिर, जलव्यवस्था, शिक्षणसंस्था यांचे बांधकाम करून त्या काळातच त्यांनी सर्वसमावेशकतेचे उत्तम उदाहरण घालून दिले. स्त्रीशक्तीचा आदर्श कसा असावा, हे त्यांच्याकडून शिकावे लागेल.”

अहिल्यादेवींचे ज्ञानदान आणि शैक्षणिक दृष्टिकोन आजही प्रेरणादायी आहेत. त्यांनी अनेक तत्त्वज्ञ आणि धर्माचार्यांशी संवाद साधून समाजाला ज्ञानप्रद मार्गदर्शन केले. त्यांनी लोककल्याणार्थ धर्म व अध्यात्माचा उपयोग करून सामाजिक स्थैर्य निर्माण केले.

“आजच्या युवा पिढीने अहिल्यादेवींप्रमाणे समाजासाठी झोकून देण्याची प्रेरणा घ्यावी. त्यांच्या राज्यकारभाराची तत्वे म्हणजेच पारदर्शकता, सेवा, कर्तव्यनिष्ठा, आणि न्याय – ही तत्वे जर आपल्याला आत्मसात करता आली, तर खऱ्या अर्थाने आपण त्यांच्या कार्यास अभिवादन करू शकतो,” असेही अशोकभाऊ जैन यांनी यावेळी सांगितले.

या ऐतिहासिक रॅलीमध्ये शेकडो चारचाकी वाहनांच्या माध्यमातून जिल्ह्यातून प्रेरणादायी यात्रा काढण्यात येणार असून, यामध्ये शहरातील व ग्रामीण भागातील युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था, आणि राजकीय नेते मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत.

ही रॅली केवळ एक वाहन यात्रा नसून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना त्रिशताब्दी वर्षात सामूहिक अभिवादन करण्याचा एक सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक उपक्रम आहे. सदर भेटी प्रसंगी दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, धनगर समाज महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष करे, मल्हार सेनेचे प्रदेश सरचिटणीस संदीप तेले, धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप धनगर, धनगर समाज कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल, मल्हार सेनेचे विभागीय अध्यक्ष डॉ. संजय पाटील, दिलीप नाझरकर,सचिन धनगर, अश्विन सैंदाणे आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonChairman of Jain Industry GroupPunyashloka Ahilyadevi Holkar's thoughts are inspiring for the society – says Ashokbhau Jain

Related Posts

गुन्हे

मनरेगा घोटाळ्याची तक्रार करणाऱ्यावर पारोळ्यात कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; १२ जणांवर गुन्हा दाखल

May 27, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 27 मे 2026 !

May 27, 2026
गुन्हे

ओडिशातील खून, ५ कोटींच्या खंडणी प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद

May 26, 2026
गुन्हे

सबगव्हाण येथे दोन गटात तुंबळ हाणामारी; ६ जणांविरुद्ध गुन्हा

May 26, 2026
गुन्हे

विद्यार्थीनीला घरात बोलावून ७२ वर्षीय वृद्धाने केला विनयभंग

May 26, 2026
Next Post

विवाहप्रसंगी बर्तन बँकेचा वापर करणाऱ्या संजय महाजन यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रोटरी जळगाव रॉयल्सतर्फे आयोजित योगासन शिबिरात मिळाला निरोगी जीवनाचा मंत्र

June 20, 2021

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने संजय पवार राज्यपालांच्या हस्ते सन्मानित !

November 8, 2020

म.सा.प.निमंत्रित सदस्यपदी धरणगांवचे प्रा.बी.एन.चौधरी :

July 31, 2025

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ; पेगासस हेरगिरीच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना

October 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group