मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे यांच्या बंडाळी नंतर राज्यात राजकीय अस्थिरतेची शक्यता निर्माण झाली. शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची 200 एकर जागा, कारखान्याची इमारत आणि कारखान्यात असलेली यंत्रसामग्री जप्त केली आहे. अर्जुन खोतकर यांच्या साखर कारखान्यावर ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
ईडीने अर्जुन खोतकर यांच्या कारखान्याची जवळपास ७८ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी अर्जुन खोतकर यांच्या कारखान्यावर धाड टाकली होती. त्यानंतर आता ईडीने खूप मोठी कारवाई केली होती. यात जमीन, एक रेसिडेन्शिलय प्लॅन्ट, एक बिल्डिंग आणि स्ट्रक्चर अशी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरुन ही माहिती देण्यात आली आहे.
तात्पुरत्या स्वरूपात ईडी कडून ही संपत्ती जप्त करण्यात आली आहे . गेल्या दोन महिन्यांपूर्वी ईडीने जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून साखर कारखान्यावर निर्बंध लावण्याचे आदेश ईडीने दिले होते. 26 नोव्हेंबर 2021 रोजी ईडीचे एक पथक खोतकर यांच्या घरी दाखल झाले होते. त्यांनी रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी खोतकरांची कसून चौकशी केली होती.