धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मातोश्रीचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. परंतू या कठीण काळातही त्यांनी शेतकऱ्यांच्या परिवाराची काळजी होती. कुणाचाही बैलपोळा दुःखात जाऊ नये म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदारांना बैलजोडी सजवण्यासाठी साज, ज्यांच्याकडे बैलजोडी नाही, त्यांना किराणा किटचे वाटप कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
ना. पाटील यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना स्वतः भेटुन ही भेट द्यायची होती. परंतु दुर्दैवाने त्यांच्यावर अचानक ओढवलेल्या दु:खामुळे ते स्वतः पोहचू शकले नाहीत. तरी देखील दुसऱ्यांच्या आनंदात आपला वाटा असावा, या भावनेने त्यांनी आपले दु:ख बाजुला सारत शेतकऱ्यांचा पोळा गोड केला. ना. गुलाबराव पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव ग्रामीण मतदारसंघातील जळगाव तालुक्यातील भादली बु. येथे ३, सुजदे, ममुराबाद गावांमध्ये पंचायत समिती सदस्य तुषार महाजन यांच्या उपस्थितीत देण्यात आले. तर कंडारी २, शिरसोली २, धानवड येथे तालुकाप्रमुख शिवराज पाटील यांनी पिडीत परिवाराला जाऊन मदत केली. त्याच्पाधातीने कानळदा येथे २, भोकर ३, गाढोदा, घाडी, करंज, नांद्रा बु २, रिधुर येथे बालासेठ व संदीप पाटील हे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या दु:खात सहभागी झाले. वडली, दापोरा, जवखेडा, विटनेर २, म्हसावद, पाथरी येथे जि.प. सदस्य पवनभाऊ सोनवणे, मोहाडी सरपंच धनंजय सोनवणे यांच्या सहकार्याने कीटचे वाटप करण्यात आले.
धरणगाव तालुक्यातील जांभोरा, भवरखेडा २, रोटवद, धानोरा, अनोरा २, विवरे, साळवे २, नांदेड या गावात युवा सेना तालुकाप्रमुख दीपक भदाणे, वरड खु, अंजनविहीरे, भोद बु, चिंचपुरा, कल्याणे खु., वाघळूद खु, सतखेडा, पष्टाने, आहिरे बु, चमगांव ३ येथे युवासेना उपतालुका प्रमुख अजय पाटील, अनिकेत पाटील, पाळधी बु, पाळधी खु, पथराड बु, पथराड खु २, दोनगाव बु, शेरी येथे २, खपाट या गावांमध्ये माजी सरपंच अरुण पाटील यांनी जाऊन गावकरी यांच्या उपस्थित एकूण दोन्ही तालुक्यातील ७५ आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीच्या कीटचे वाटप केले.