जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने महाराष्ट्र अल्पसंख्याक सेलच्या प्रदेश महासचिवपदी जळगावचे रागीब अहमद यांची निवड करण्यात आली आहे.
प्रदेश कार्यकारणीत महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी मुख्तार अहमद (अहमदनगर), बालम पटेल (नाशिक), अरिफ पटेल (नागपुर), मोहम्मद मुश्ताक (भंडारा) यांचीही निवड करण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी पद्मविभूषण शरद पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य अल्पसंख्यांक समाजाचा विकासात आपण भरीव कार्य कराल व पक्षसंघटना मजबुतीने उभी कराल. असे नियुक्ती पत्रात म्हटले असून निवडीबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे. या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे, डॉ.सतीश पाटील, गुलाबराव देवकर आणि जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी रागीब अहमद यांचे अभिनंदन केले आहे.