मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची घेण्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले आहेत. या भेटीचे नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही.
राज्यपाल भेटीपूर्वी सकाळी ९ वाजता काही ठराविक पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी कृष्णकुंजवर बैठकीसाठी बोलवले होते. राज्यपाल कोश्यारी यांचे निवासस्थान असलेल्या राजभवन येथे ही भेट होणार आहे. लोकहिताच्या प्रश्नांसाठी राज ठाकरे राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान राज ठाकरे मायक्रोफायनान्स कंपन्यांचा मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज्यपालांना भेटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यपालांच्या भेटीआधी राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. राज ठाकरेंसोबतच्या बैठकीसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, शिरीष सावंत, रिटा गुप्ता यांसह इतर पदाधिकारी कृष्णकुंजवर दाखल झाले आहे.