जळगाव (प्रतिनिधी) जळगावात लागलेल्या पैजेची राज्यभर चर्चा रंगली आहे. गिरीश महाजन यांच्या पीएने ओपन चॅलेंज दिलं होतं. फेसबुक पोस्ट (Facebook post) करत त्यांनी पैज लावण्याचं आवाहन केलं होतं. राज्यसभा निवडणुकीत अरविंद देशमुख यांनी भाजपचे तिन्ही उमेदवार जिंकली, अशी पैज लावली होती. यानंतर अखेर राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता पुढे आला. त्यानंतर चॅलेंज स्वीकारलं आणि पैज लावली. दरम्यान, पैज हरल्यानंतर आता एक लाख रुपये या कार्यकर्त्याला गिरीश महाजनांच्या पीएला पैज हरल्यानं द्यावे लागणार आहेत.
भाजप नेते गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख यांनी भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी होणारच, असा दावा गुरुवारी केली होता. फेसबुक पोस्ट करत त्यांनी पैज लावण्यासाठी ओपन चॅलेंज दिलेलं. देशमुख यांनी 1 लाखाची पैजही याखातर लावली आणि ती स्वीकारण्याचं आव्हानही दिलं. देशमुखांनी दिलेलं हे आव्हान कोण स्वीकारणार? अशी चर्चा त्यानंतर सुरु झाली. सोशल मीडियावरील ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचा कार्यकर्ता राहुल पाटील यांनेही ते स्वीकारलं. पण रात्री अखेर ही शर्यत राष्ट्रवादी कार्यकर्ता राहुल पाटील हरले. आता त्यांना एक लाख रुपये गिरीश महाजन यांचे पीए अरविंद देशमुख यांना द्यावी लागणार आहे.
विजयानंतरची फेसबुक पोस्ट
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अरविंद देशमुख यांनी फेसबुक पोस्टही करत, देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख बिग बॉस म्हणून केलाय. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की..गुरुवारी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान झालं होतं. या मतदानासाठी व्हिलचेअर, एम्ब्युलन्स मधून येत ८ भाजप आमदारांनी जातीने मतदानासाठी हजेरी लावलेली. दरम्यान, शिवसेना आणि भाजप असा थेट सामना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी होताना दिसला. यात कोल्हापूरमधून संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात सामना झाला. यात भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केलाय.
















