पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील एका व्यक्तीने पंढरपूर तालुक्यातील एकाची ५ लाख ५० हजाराची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील शेदुर्णी येथील संशयित आरोपी साहेबराव बाविस्कर याने पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील सुरेश घोडके (वय ४८) यांना ऊस तोडीची मजूरी द्यायची असल्याचे सांगत ट्रकमध्ये बसून जावून कोणत्याही मजुराला पैसे न देता पळून गेला. यामुळे सुरेश घोडके यांची तब्बल ५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पहूर पोलिसात त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.प्रशांत विरनारे हे करीत आहेत.