TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आदित्यनाथ पंतप्रधान झाले तर देशातील धार्मिक एकता धोक्यात येईल : इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा

The Clear News Desk by The Clear News Desk
February 16, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान झाल्यास देशातील धार्मिक एकता धोक्यात येईल. अशी भीती प्रसिद्ध लेखक आणि इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं आहे. गुहा यांनी टेलिग्राफ इंडियासाठी लिहिलेल्या एका लेखामध्ये योगी आदित्यनाथ देशाचे पंतप्रधान झाल्यास काय होईल यासंदर्भात भाष्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सध्याचे गृहमंत्री अमित शाह हे पंतप्रधान पदाचा दावेदार असण्याची शक्यता कमी असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पंतप्रधानपदी विराजमान होण्याची अधिक शक्यता असल्याचे मत प्रसिद्ध लेखक आणि इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं आहे. गुहा यांनी टेलिग्राफ इंडियासाठी लिहिलेल्या एका लेखामध्ये योगी आदित्यनाथ देशाचे पंतप्रधान झाल्यास काय होईल यासंदर्भात भाष्य केलं आहे. या लेखामध्ये गुहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सध्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी असणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्यामधील साम्य आणि फरक यावर बोलताना मोदींपेक्षा योगींचे नेतृत्व देशातील सामाजिक एकता बिघडवण्याचं काम करेल अशी भीती व्यक्त केली आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

रामचंद्र गुहा यांनी, वेटींग इन विंग्स म्हणजेच भरारी घेण्यास तयार असणारा पक्षी अशा अर्थाचा एक लेख लिहिला असून यामध्ये त्यांनी योगी पंतप्रधान झाल्यास देशातील धार्मिक एकताही धोक्यात येईल असं म्हटलं आहे. लेखाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय असणारे अमित शाह हे मोदींचे वारसदार होऊन पंतप्रधानपदाची गादी संभाळतील असं २०१९ पर्यंत सर्वांनाच वाटत होतं असं नमुद केलं आहे. मात्र २०२० च्या शेवट होईपर्यंत योगी आदित्यनाथ हे अधिक जोमाने पुढे आले असून धार्मिक मुद्द्यांसंदर्भातील त्यांच्या धोरणांंची अंमलबाजवणी कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यातील मुख्यमंत्र्याकडूनही नवीन कायदा लागू करुन केली जात आहे. हे एकप्रकारे योगी आदित्यनाथ यांचं नेतृत्व येडियुरप्पा आणि शिवराज सिंह चौहान यांच्यासारख्या नेत्यांनी मान्य केल्यासारखं असल्याचं मत गुहा यांनी व्यक्त केलं आहे. राजकारणामध्ये टीकून राहण्यासाठी योगींप्रमाणेच टोकाचं राजकारण करणं काळाची गरज असल्याचं या नेत्यांना कळालं आहे, असंही या लेखात म्हटलं आहे.

याच लेखामध्ये मोदी आणि योगीमध्ये फरकही असल्याचं गुहा यांनी म्हटलं आहे. मोदी किमान सबका साथ सबका विकास असं म्हणतात, मेट्रोत एखाद्या मुस्लिमासोबत फोटो तरी काढतात. मात्र योगी असलं काही करत नाहीत. हिंदू हे इतर कोणत्याही धर्मावर श्रद्धा असणाऱ्या आणि खास करुन मुस्लीमांपेक्षा वरचढ आहेत असं योगी समजतात, असा उल्लेख या लेखात आहे. योगी यांनी हिंदू युवा वाहिनी नावाची संघटना स्थापन केली असून हिंका, दंगल आणि इतर प्रकरणांमध्ये या संघटनेविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. आज योगी मुख्यमंत्री झाल्यानंतरही ही संघटना कार्यरत आहे, असं गुहा यांनी म्हटलं आहे. अशाप्रकारे एखादी हिंदुत्वावादी संघटना स्थापन करुन मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचलेले योगी एकमेव नेते असल्याचं गुहा सांगतात.

देशामध्ये अधिक शक्तीशाली होणं हेच योगींच एकमेव ध्येय

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी जगभारतील अनेक देशांमध्ये दौरे करुन तेथील नेत्यांना भारताकडे आर्षित करण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना संमिश्र यश मिळालं. मात्र योगी अदित्यनाथ पंतप्रधान झालेत तर जगातील इतर देश त्यांच्याबद्दल आणि भारताबद्दल काय विचार करतात याबद्दल त्यांना फारशी चिंता नसेल. देशामध्ये आपण अधिक शक्तीशाली होणं हेच त्यांचं एकमेव ध्येय असेल. खास करुन राजकीय, वैचारिक आणि धार्मिक मतांशी आपल्याशी सहमत नसणाऱ्यांविरोधात शक्तीप्रदर्शन करण्याचा त्यांचा विचार असेल असं गुहा म्हणतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

लग्न समारंभ, आठवडे बाजार, गर्दीच्या कार्यक्रमांवर असणार मनपाची नजर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा मुस्तफा स्कूलमध्ये रंगला सांस्कृतीक कार्यक्रम !

January 17, 2024

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या उपस्थितीत उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश !

August 17, 2024

जळगाव : महिलेच्या पर्समधून ८ हजारांची रोकड लांबविली; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ! जळगाव (प्रतिनिधी) शहरातील सेंट्रल बँकजवळून एका महिलेच्या पर्समधून ८ हजार रूपयांची चोरी केल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखाबाई बापू गायकवाड वय ४० रा. रामेश्वर कॉलनी जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता महिला ह्या जळगाव शहरातील सेंट्रल बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या होत्या. त्यांनी बँकेतून ८ हजार रूपये काढून पर्समध्ये ठेवले. दरम्यान अज्ञात दोन महिलांनी त्यांच्या पर्समधील ८ हजार रूपये काढून चोरी केली. त्यानंतर महिलेने मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानसार अज्ञात दोन महिलांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर निकुंभ हे करीत आहे.

September 25, 2024

पुन्हा एकदा ‘फर्जीवाडा…रेस्टॉरंट आणि बारचे फोटो ट्वीट करत क्रांती रेडकरचा नवाब मलिकांवर टीका !

November 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group