TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात ९ ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन

रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी नागरीकांनी महोत्सवास भेट देण्याचे कृषि विभागाचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
August 3, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक, आत्मा, जळगाव, कृषि विज्ञान केंद्र, जळगाव व रोटरी क्लब, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता रोटरी क्लब, मायादेवी नगर, महाबळ रोड, जळगाव येथे रानभाजी महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) संभाजी ठाकुर यांनी दिली आहे.

पालकमंत्र्यांच्या हस्ते महोत्सवाचे होणार उद्घाटन

READ ALSO

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश !

या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शुभहस्ते व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रंजनाताई पाटील यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमास खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, खासदार उन्मेश पाटील, जिल्हा परिषदेच्या कृषि सभापती श्रीमती उज्वलाताई माळके, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे आदि मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवात विविध रानभाज्या विक्रीसाठी राहणार

मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अन्न्यसाधारण महत्व आहे. सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये रानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्यांचे/रानफळांचे महत्व व आरोग्यविषयक माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणे आवश्यक आहे. रानभाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्ठिक अन्नघटक असतात तसेच या रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक/बुरशीनाशक फवारणी करण्यात येत नाही. मानवी आरोग्यामध्ये रानभाज्या शरीराला आवश्यक असणारे अन्नघटक, जीवनसत्वे, खनिजे व औषधी गुणधर्माबाबत परिपूर्ण असतात. या रानभाज्यांची ओळख, आरोग्याच्या दृष्टिने त्यांचे महत्व, पाककृती इ. बाबत नागरीकांमध्ये जागृती व्हावी, त्यांना गोडी लागावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. त्याचबरोबर या भाज्यांची विक्री व्यवस्था वाढून त्या विक्रीतून शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा होईल. या महोत्सवा दरम्यान जिल्ह्यातील शेतकरी विविध रानभाज्या उदा. करटोली, आघाडा, पाथरी, घोळ, तांदळजा, कुर्डु, गुळवेल, शेवगा इ. विविध रानभाज्या विक्रीसाठी आणणार आहेत.

शेतकऱ्यांनी कृषि विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन

रानभाजी महोत्सव तालुकास्तरावरही ९ ते १५ ऑगस्ट, २०२१ या कालावधीत सप्ताह स्वरुपात राबविण्यात येणार आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी त्यांचेकडील उपलब्ध मालाच्या तपशीलासह प्रकल्प संचालक, आत्मा, जळगाव अथवा आपले तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच जास्तीत जास्त नागरीकांनी या रानभाज्या महोत्सवात खरेदीचा आनंद घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात

June 21, 2025
क्रीडा

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश !

June 21, 2025
क्रीडा

अन्वरीया ग्रुपने पटकावले विजेते पद

June 21, 2025
जळगाव

महावितरणच्या नाट्यस्पर्धेत रत्नागिरीचे ‘आवर्त’ प्रथम

June 21, 2025
जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या समस्यांबाबत संवेदनशील – प्रवीण सपकाळे

June 21, 2025
गुन्हे

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

June 20, 2025
Next Post

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव पोलिसांचा डंका, जळगाव संघाने मिळवले सर्वसाधारण विजेतेपद !

November 25, 2023

बापरे ! पुण्यात ९ बँकांची तब्बल एक कोटींची फसवणूक !

February 8, 2022

आधी अपहरण, मग चौघांनी ढोसली मनसोक्त दारू ; नंतर केला महिलेवर सामुहिक पाशवी अत्याचार !

July 1, 2023

धरणगावात गुटखा विक्रीला प्रशासकीय मान्यता?

December 3, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group