चोपडा (प्रतिनिधी) पंकज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वाचन संकल्प अभियान अंतर्गत वाचन संकल्प विकास कार्यशाळा दि. १/०१/२०२५ रोजी उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. आर.आर. अत्तरदे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे प्रा. डॉ. दिलीप गिऱ्हे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे ग्रंथपाल डॉ. राहुल जाधव यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतातून वाचन संकल्प अभियानाची सुरुवात व तिचे वैशिष्ट्य हे आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. आर.आर.अत्तरदे यांनी विद्यार्थी दशेत वाचन संस्कृती ही किती महत्त्वाची असते व तसेच विद्यार्थ्यांना वाचनाच्या माध्यमातून कसे यश प्राप्त होते हे स्पष्ट केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रो. डॉ. किशोर पाठक हे लाभले. त्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयीन ग्रंथालय हे विद्यार्थ्यांसाठी कसे उपयुक्त असते व त्याचा वापर हा आपल्या पातळीवर कशा प्रमाणे करावा याचे सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार हे प्रा. सुनील सुरवाडे यांनी मानले. प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.