जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १६४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ५६० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – १८, जळगाव ग्रामीण-०३, भुसावळ-३२, अमळनेर-०१, चोपडा-०५, पाचोरा-३५, भडगाव-०१, धरणगाव-००, यावल-०२, एरंडोल-०२, जामनेर-०५, रावेर-११, पारोळा-०६, चाळीसगाव-२६, मुक्ताईनगर-१५, बोदवड-०१, इतर जिल्ह्यातील-०१ असे एकुण १६४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १४० हजार ३०६ पर्यंत पोहचली असून १३३ हजार ००९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५३९ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ४७५८ रुग्ण सध्या उपचार घेताय.