जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ४८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ११७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एकही रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
जळगाव शहर – ०५, जळगाव ग्रामीण-०२, भुसावळ-०१, अमळनेर-०३, चोपडा-०२, पाचोरा-०२, भडगाव-०१, धरणगाव-०३, यावल-०३, एरंडोल-०३, जामनेर-०८, रावेर-०४, पारोळा-०३, चाळीसगाव-०६, मुक्ताईनगर-०१, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०० असे एकुण ४८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १४१ हजार ९३४ पर्यंत पोहचली असून १३८ हजार ००१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एकही रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५६८ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर १३६५ रुग्ण सध्या उपचार घेताय.
दिलासादायक
जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या दुस-या लाटेत चार महिन्यानंतर प्रथमच शून्य मृत्यू.
यापूर्वी १९ फेब्रुवारी रोजी शून्य मृत्यू होते.